breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलीसांची स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्याची आयुक्तांना सूचना, मंत्री मोहोळ यांची माहिती

पुणे : पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतची कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने आणि सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, अशी निलंबित पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्स (X) अकाउंटवर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील ‘एल ३-लिक्विड लीजर लाउंज’ पब बारमध्ये रविवारी (ता. २३) पहाटेपर्यंत चाललेल्या पार्टीत धांगडधिंगा सुरू होता. तसेच या पबमध्ये काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचा व्हिडिओ सकाळी व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासन जागे झाले. याप्रकरणी पोलिसांनी पबचालकासह पाच जणांना अटक केली आहे. संबंधित पब, बार सील केला असून, याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण ८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या ८ जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. बार मालकासह, डीजे, मॅनेजरसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ कलम लालण्यात आले आहेत.

हेही वाचा   – चऱ्होलीतील शाळा आरक्षण खासगी संस्थेस देण्यास विरोध 

या प्रकरणात निलंबनाची कारवाई ही तत्काळची असली तरी पूर्ण पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलीसांची स्वतंत्र मोहिम आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

‘त्या’ व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक निलंबित…पुण्यातील अमली पदार्थ सेवन करतानाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपल्या सूचनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून ज्या हद्दीतील हा प्रकार आहे, त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबनाची कारवाई ही तत्काळची असली तरी पूर्ण पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलीसांची स्वतंत्र मोहिम आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केली आहे.

सर्व महाविद्यालये, पब्स, हॅाटेल्स, संशयास्पद ठिकाणं येथे त्वरीत ही शोधमोहिम कडक कारवाईसह करण्यात यावी आणि अंमली पदार्थ पुणे शहरात उपलब्ध होतात कसे? याच्या मुळाशी पोहचण्यासाठी प्रभावी तपास मोहिम सुरू करण्यात यावी, अशाही सूचना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button