Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे शहरातील उद्या प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

पुणे :  जिल्हा प्रशासनाच्या विद्यमाने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित “पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६” या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन १९ ते २४ जानेवारी २० दरम्यान करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील प्रोलॉग रेस मंगळवार, १९ जानेवारी २०२६ रोजी पुणे शहरात होणार असून, त्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने शहराच्या मध्यवर्ती आणि पश्‍चिम भागातील रस्ते तब्बल ९ तास बंद रहाणार असल्याचे आदेश जारी केले आहेत.

सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील आणि पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोलॉग स्पर्धेदरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रोड तसेच त्यांना जोडणारे उपरस्ते पूर्णतः वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत.

या मार्गांवर अत्यावश्यक सेवेतील वाहने (रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने आदी) वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहणार आहे.स्पर्धेचा मार्ग खंडोजी बाबा चौक – गुडलक चौक – तुकाराम महाराज पादुका चौक – ललित महल चौक – चाफेकर चौक – रेंज हिल्स – सिमला ऑफिस चौक – संचेती चौक – बालगंधर्व चौक – डेक्कन जिमखाना बस स्थानक असा असणार आहे.

या संपूर्ण मार्गावर दोन्ही बाजूंनी नो-पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहनचालकांसाठी विविध पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून, नागरिकांनी त्याचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा –  प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे ‘हॅपी क्लासरूम’ विषयावर शिक्षक प्रशिक्षण

या’ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

दरम्यान, या वाहतूक निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता, छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड, विश्रामबाग-वाडा-कसबा, ढोले पाटील रोड, भवानी पेठ, औंध-बाणेर, कोथरुड-बावधान, सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक शैक्षणिक संस्था मंगळवार, १९ जानेवारी रोजी पूर्ण वेळ बंद ठेवण्याची विनंती जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, या कालावधीत अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा व पोलिसांच्या सूचनांचे पालन करून स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

‘स्पर्धेमुळे शहराची प्रतिमा जागतिक पातळीवर झळकणार आहे. हा स्वत:चा इव्हेंट समजून सहकार्य करा. सायकल स्पर्धेचा आंनद घेऊन स्पर्धा यशस्वी करा.’

– रंजन कुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त

“या स्पर्धेचा एक टप्पा २३ जानेवारीला पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये असणार आहे. यामध्ये स्पर्धक ९९ किलोमीटरचा टप्पा गाठतील, त्यातील ५८ किलोमीटरचा भाग पुणे शहरातील असेल. यामुळे २३ तारखेलाही शहरांतर्गत वाहतूकीवर निर्बंध असतील. मात्र वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. या दिवशी सुरवात बालेवाडीतून होऊन समारोप जंगली महाराज रस्त्यावरली झाशी राणी चौकात होणार आहे.”

– मनोज पाटील ,अपर पोलीस आयुक्त

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button