महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघाने सुवर्णपदक जिंकावे: संदीप खर्डेकर
21 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रोलबॉल चा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश
![Maharashtra boys and girls team should win gold: Sandeep Khardekar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Sandep-Khardekar--780x470.jpg)
पुणे: अथक परिश्रम आणि ध्येयप्रतीची निष्ठा यामुळेच आज तब्ब्ल 21 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रोलबॉल चा समावेश राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत झाला असून आता महाराष्ट्राच्या संघाने मुलांच्या आणि मुलींच्या अश्या दोन्ही विभागात सुवर्णपदक जिंकावे अश्या शुभेच्छा महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी दिल्या.
गोवा येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु असून उद्यापासून त्यात देशातील 8 सर्वोत्तम संघांमध्ये सुवर्णपदकांसाठी लढत होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या मुलं आणि मुलींच्या संघाला आज बालेवाडी स्टेडियम येथे निरोप देण्यात आला यावेळी ते बोलत होते.
रोलबॉल चा जन्म पुण्यात झाला, ह्या महाराष्ट्राच्या मातीतील राजू दाभाडे ह्या सामान्य कुटुंबातील मुलगा ह्या खेळाचा जनक. आज हा खेळ 57 देशात खेळला जात असून भारतात देखील जवळपास सर्वच राज्यात हा खेळ खेळला जातो.
आज सराव शिबिराच्या समारोप प्रसंगी राज्याचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, सरचिटणीस प्रताप पगार, व्यवस्थापक दादासाहेब भोरे, मार्गदर्शक अमित पाटील, संजय कोल्हे, हेमंगिनी काळे,ऐश्वर्या मदाने, आनंद पटेकर उपस्थित होते. यावेळी दोन्ही संघांना स्पर्धा जर्सी भेट देण्यात आल्या व यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कोणत्याही खेळात संघभावना महत्वाची असून संघ विजयी व्हावा यासाठी सर्व खेळाडू प्रयत्न करतील व व्यक्तिगत विक्रमांपेक्षा सांघिक भावनेला महत्व देतील अशी अपेक्षा ही संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली.