शहरातील विविध भागात जनजीवन विस्कळीत;अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान युद्धपातळीवर कार्यरत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-53-2-780x470.jpg)
पुणे : पुणे जिल्ह्यात आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. तसेच, काल सकाळी (24 जुलै) 07:00 वाजेपासून आज ((25 जुलै) सकाळी 11:00 वाजेपर्यंत अग्निशमन दल नियंत्रण कक्षात शहरातील विविध भागातून वर्द्या आलेल्याआहे.
आत्तापर्यंत अग्निशमन दलाने जवळपास 160 नागरिकांची सुखरुप सुटका केली/सुरक्षित स्थळी हलविले आहे. बोटी, रश्शी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग असे विविध साहित्य वापरले. स्वत: मुख्यअग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी तसेच इतर वीस अग्निशमन अधिकारी व जवळपास तीनशे जवान विविध वर्द्यांवर कार्यरत आहेत.
अग्निशमन दलाने नागरिकांची केलेली सुटका
– रजपुत विट भट्टी, खिलारेवाडी – 31नागरिक
– वारजे तपोधाम – 48 नागरिक (ज्यामध्ये एक पॅरलिसिस झालेला मुलगा व एका गर्भवती महिलेचा समावेश)
– डेक्कन पुलाची वाडी – 15 नागरिक
– पाटील इस्टेट झोपडपट्टी – 10
– सिहंगड रोड, निंमज नगर – ७० नागरिक सुटका
हेही वाचा – Positive Initiatives | नैसर्गिक आपत्तीच्या काळात आमदार महेश लांडगे यांची सतर्कता!
शहरात एकूण 63 झाडपडीच्या घटना घडल्या असून 3 ठिकाणी( (भवानी पेठेत वाड्याची भिंत पडली व कोरेगांव पार्क, बर्निंग घाट नजीक भिंत पडली/खड्डा पडला – वडगावबुद्रुक) भिंत पडण्याच्या घटना घडल्या आहेत.
तसेच एकूण 16 ठिकाणी (वारजे, स्वामी विवेकानंद सोसायटी व फ्युचेरा सोसायटीत – शिवणे, सदगुरू सोसायटीत – सिहंगड रोड याठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी व इतर तीन सोसायटीमध्ये – नदीपाञ रस्ता, रजपुत वीटभट्टी नजीक, गंजपेठ, चांदतारा चौक – शिवाजीनगर, कर्वेनगर, पुलाची वाडी, पाटील इसटेट व इतर) पाणी साचल्याचे समजत आहे.
सद्यस्थितीत अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान कार्यरत असून पाणी शिरलेल्या घटनास्थळी अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याकामी कार्यवाही करीत आहेत.वरील सर्व घटनांमध्ये अद्याप कुठे ही जखमी वा जिवितहानी नाही.