ताज्या घडामोडीपुणे

कारगिल विजय दिनानिमित्त विद्यानिकेतन स्कूलमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात

शिक्षक, विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धक सहभाग, देशभक्तीपण गीत, भाषणांद्वारे मनोगते सादर

चाकणः श्री.एस पी देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन स्कूल चाकण या प्रशालेमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम २७ जुलै २०२४ रोजी विद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणातून आपली मनोगते व्यक्त केली.

Kargil, Vijay, Din, Vidyaniketan, Schools, Programmes, Enthusiasm, Teachers, Students, Patriotism, Songs, Speeches, Moods,
Kargil, Vijay, Din, Vidyaniketan, Schools, Programmes, Enthusiasm, Teachers, Students, Patriotism, Songs, Speeches, Moods,

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव रोहिणी देशमुख, स्वाती रणदिवे, प्राचार्य दीपक शिंदे, समन्वयक सोमनाथ हतुरे व माधुरी घोडेकर हे उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या कारगिल विजय दिना चे औचित्य साधत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद जवान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

विद्यालयातील विद्यार्थिनी कु. दृष्टि ने आपल्या भाषणातून देशभक्तीपर आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील शिक्षक सोमनाथ हत्तुरे यांनी कारगिल युद्धाचे महत्त्व विशद करताना कारगिल युद्धातील अनेक पेच प्रसंग सुंदररित्या विद्यार्थ्यांसमवेत व्यक्त केले.

देशभक्तीपर गाण्यावर सौ पूनम दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी (मे नही तुटना) या देशभक्तीपर गीतावर सुंदर नृत्य सादर केले . शाळेतील मुख्याध्यापक श्री. दिपक शिंदे यांनी कारगिल युद्धातील विविध प्रसंग नमूद करत स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या कलेनुसार कार्य केले पाहिजे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या सामोरे जावे व विद्यार्थ्यांना कारगिल दिनाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी नी सैन्य भरती साठी प्रयत्न करावे. कारगिल दिनांचे औचित्य साधत इ.८वीच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन करत पर्यावरण जनजागृती व प्लास्टिक वापर टाळा यासंदर्भात जागृती करण्यात आली.‌

विद्यालयातील मुख्याध्यापक दीपक शिंदे व समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समृद्धी राऊत या विद्यार्थिनीने केले.

कार्यक्रमाच्या शेवटी शालेय शिक्षिका श्वेता बेल्हेकर व हर्षदा पाटील यांनी ओ देस मेरे हे देशभक्तीपर गीत सादर केले, व कार्यक्रमाची सांगता ही राज्य गीत व राष्ट्रगीताने करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button