ताज्या घडामोडीपुणे

कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी घुसल्याची अफवा पसरल्याने एकच खळबळ

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन संशयितांना ताब्यात घेतले

पुणे : शहरातील कमला नेहरू रुग्णालयात बुधवारी सकाळी दहशतवादी घुसल्याची अफवा पसरल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत ते मूळचे बिहारचे असून, वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बांगलादेशी नागरिक शहरात फिरत असल्याचा संदेश सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता. काहीजणांनी त्यांची छायाचित्रे पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. ते तिघेजण महापालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात सुरक्षा रक्षकांना आढळून आले. सुरक्षा रक्षक रोहित माने, वैभव बोबडे, नितीन लांडगे, विशाल कांबळे यांनी त्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांना दिली. त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयाच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला. रुग्णालयात बाहेरील लोकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यावेळी रुग्णालयात दहशतवादी घुसल्याची अफवा पसरली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली.

या संदर्भात पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल म्हणाले, ‘मंगळवारी (ता. १३) एका व्यक्तीला तिघे बांगलादेशी शहरात आल्याचा संशय होता. त्याने तिघांची छायाचित्रे आणि संदेश पोलिसांना पाठविला. शिवाय, सोशल मीडियावरही तिघांची छायाचित्रे प्रसारित केली होती. त्यानुसार काल पोलिसांनी चौकशी केली होती. आज बुधवारी सकाळी ते तिघेजण कमला नेहरू रुग्णालयात रक्त तपासणीसाठी आले होते.

सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्याकडून आधारकार्ड आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. ते शहरात कधीपासून राहत होते आणि नेमक्या कोणत्या कामासाठी आले होते, याबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे. ते पुण्यात मदरशासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी आले होते, अशी प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button