TOP Newsताज्या घडामोडीपुणे

बारामतीत पत्रकारावर गोळीबार; परिसरात भीतीचे वातावरण

बारामती येथे भिगवण रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी संध्याकाळी पत्रकारावर गोळीबाराची घटना घडली. गणेश उर्फ आकाश जाधव, असे गोळीबार झालेल्याचे नाव आहे. हल्ल्यात ते जखमी झाले असून, त्यांच्या मणक्याजवळ गोळी लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू आहेत.

गणेश एका स्थानिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. भिगवण रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. घटनेबाबत पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला असून, हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जाधव यांच्यावर बारामती रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हा घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button