Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महापालिकेच्या गैरकारभाराची झडती

पुणे :  महापालिकेत मागील तीन वर्षांपासून निवडणुका झालेल्या नसल्याने प्रशासकीय कारभार सुरू आहे. मात्र, या कालावधीत मोठ्या प्रमाणात गैरकारभार आणि घोटाळे समोर येत असल्याने याप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत महापालिका प्रशासनाची लवकरच बैठक घेण्याचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.

पाटील यांनी गुरुवारी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत महापालिका प्रशासनाची बैठक घेतली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा –  महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय; महिला वकिल मारहाण प्रकरणी रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्री फडणविसांना संतप्त सवाल

महापालिका निवडणुक लांबणीवर पडल्याने गेल्या तीन वर्षांपासून महापािलकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यातच लाेकप्रतिनिधींचे नियंत्रण नसल्याने प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. महापालिकेत काही महिन्यांत अतिक्रमण परवाने, मिळकतकर विभाग, डांबर खरेदी निविदा, सुरक्षा रक्षक नियुक्ती, नाले सफाईच्या निविदांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार समोर येत आहेत.

याकडे पत्रकारांनी मंत्री पाटील यांचे लक्ष वेधले. यासंदर्भात बाेलताना मंत्री पाटील म्हणाले की, शहराच्या प्रश्नांबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांच्या उपस्थितीत जम्बाे बैठक पार पडते. महापालिकेतील प्रशासनाच्या गैरप्रकाराविषयी निश्चितच पुढील काळात स्वतंत्र बैठक घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. या बैठकीसाठी पालकमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहतील, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button