ताज्या घडामोडीपुणे

पालिकेच्या मिळकत कर विभागाच्या मनुष्यबळात वाढ, अन्य विभागांतील 66 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पुणे | पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागातील कर्मचाऱ्यांच्या एकूण शंभर जागा रिक्त आहेत. त्यामुळे मिळकत कर विभागात अन्य विभागांतील 66 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महापालिकेला येत्या मार्चअखेरपर्यंत मिळकतकर विभागाकडून 2900 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये 971 कोटी रुपये मिळाले आहेत. उर्वरित आठ महिन्यांत दोन हजार कोटींचा टप्पा गाठावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिकेत नव्याने 23 गावे समाविष्ट झाली आहेत. तेथील सुमारे दोन लाख मिळकतींची नोंदणी करणे, मिळकतकर वसूल करणे हे काम प्राधान्याने करावे लागत आहे. यासह इतर योजनांद्वारे थकीत मिळकतकर वसूल करण्याचे नियोजन सुरू आहे.

मिळकतकर विभागात एकूण 340 जागा आहेत. त्यापैकी शंभर रिक्त आहेत, तर 85 जण चतुर्थ श्रेणी कामगार असल्याने त्यांचा मिळकतकराच्या कामात थेट उपयोग होत नाही. सध्या 155 जण कामात असले तरी त्यापैकी 34 जण सध्या कोरोनाच्या कामात आहेत. हे मनुष्यबळ कमी असल्याने इतर विभागातील 18 वरिष्ठ लिपिक व 48 लिपिक टंकलेखक यांची नियुक्ती मिळकतकर विभागात करण्यात आली आहे. त्यांना त्वरित या विभागात हजर होण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button