Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा व ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ वितरण समारंभ

पुणे | महाराष्ट्रातील पत्रकारांच्या नव्या पिढीच्या करिअर आणि कल्याणासाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा भव्य लोकार्पण सोहळा आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ वितरण समारंभ रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी सायंकाळी JW Marriott, पुणे येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, संसदीय कार्यमंत्री) यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी मा. अण्णा बनसोडे (उपाध्यक्ष – महाराष्ट्र विधानसभा) राहणार आहेत. विशेष उपस्थिती व शुभहस्ते पुरस्कार वितरणासाठी मा. जयकुमार गोरे (ग्रामविकास व पंचायतराज मंत्री) आणि डॉ. ओमप्रकाश शेटे (अध्यक्ष – आयुष्मान भारत मिशन, महाराष्ट्र) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा सोहळा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र – मुंबई यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला असून, समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’, ‘महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार २०२५’ आणि ‘डिजिटल स्टार पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे.

प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. राजा माने यांनी सांगितले की, “हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नसून, पत्रकारिता व समाजसेवेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. नव्या पिढीला दिशा देणारा व समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग निर्माण करणारा हा उपक्रम ठरणार आहे.”

कार्यक्रमात प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होईल. त्यानंतर महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५ विविध क्षेत्रांतील मान्यवरांना प्रदान करण्यात येतील.

हा उपक्रम नव्या पिढीच्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरेल आणि त्यांच्यासाठी नवी आशा निर्माण करेल, असा विश्वास डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक मा. राजा माने यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा   :    महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांसाठी 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुरस्कार विजेते : महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५

मा. प्राचार्य डॉ. किरण सावे, पालघर – आदिवासी भागातील शिक्षण क्षेत्रात कार्य
बिग हिट मीडिया – अनुष्का सोलवट, ऋतिक मणी, अनिल मणी – कला व मनोरंजन क्षेत्र
सचिन वायकुळे, बार्शी – तृतीयपंथीय व देहविक्रय क्षेत्रातील महिलांसाठी कार्य
प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, कंधार, नांदेड – शिक्षण व ग्रामविकास
उमाकांत मिटकर, नळदुर्ग, धाराशिव – भटक्या-विमुक्त जमातीसाठी कार्य
मोहन डांगरे, सोलापूर – महिला सक्षमीकरण व समाजसेवा
प्रशांत मोरे, महाबळेश्वर – युवा उद्योजक, बांधकाम व सामाजिक कार्य
संजय कोठारी, जामखेड – सामाजिक कार्य
नामदेवराव खराडे, छत्रपती संभाजीनगर – साखर उद्योग
स्वप्निल परदेशी, पाचगणी – चिक्की उद्योग
विजय राऊत, छत्रपती संभाजीनगर – शिक्षण, क्रीडा व साहित्य
संदीप शिंदे, यवतमाळ – बेघर मनोरुग्ण पुनर्वसन
शिवराम घोडके, बीड – प्रगत व सेंद्रिय शेती
आतिश शिरसाट, सोलापूर – बेवारस मनोरुग्ण पुनर्वसन
भास्कर घुले – श्री विघ्नहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक
संतोष ठोंबरे, बार्शी – ग्रामविकास व समाजसेवा
मानसिंगराव चव्हाण, कोरेगाव – सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन
शुभम पसारकर, गडचिरोली – निराधार पुनर्वसन, दिव्यवंदना आधार फाउंडेशन

महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार २०२५

सरिता कौशिक – संपादिका, एबीपी माझा, मुंबई
साहिल जोशी – संपादक, मुंबई तक
संजीव उन्हाळे – ज्येष्ठ पत्रकार, छत्रपती संभाजीनगर
भारत चव्हाण – ज्येष्ठ पत्रकार, लोकमत, कोल्हापूर
दिलीप सपाटे – अध्यक्ष, विधीमंडळ वार्ताहर संघ, मंत्रालय, मुंबई

डिजिटल स्टार पुरस्कार

नितीन पाटील – पोलीसनामा
अश्विनी जाधव – लोकमत डिजिटल
अभिजीत दराडे – मटा डिजिटल
विष्णू सानप – लेटसअप डिजिटल
ओमकार वाबळे – मुंबई तक डिजिटल

संयोजन समिती

राजा माने (संस्थापक अध्यक्ष), सतीश सावंत, महेश कुगांवकर, नंदकुमार सुतार, केतन महामुनी, शामल खैरनार, राजू वाघमारे, विकास भोसले, तेजस राऊत, इक्बाल शेख, दिपक नलावडे, अमोल पाटील, अजिंक्य स्वामी, गणेश हुबे, प्रशांत साळुंके.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button