पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! 17 एप्रिलला ‘या’ भागांत पाणीपुरवठा राहणार बंद, दुसऱ्या दिवशी कमी दाबाने…

पुणे : आगम मंदिर येथे मुख्य दाब जलवाहिनीमधून होणारी गळती थांबविणे आणि राजमाता भुयारी मार्ग येथे स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार, दि. १७ एप्रिल २०२५ रोजी पुणे महापालिकेचा खालील भागांचा पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
महापालिकेच्या जलविभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भागांमध्ये शुक्रवारी, दि. १८ एप्रिल २०२५ रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन आवश्यक पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा – ‘महात्मा फुलेंचे कार्य इतिहासात अजरामर’; आमदार महेश लांडगे
पाणीपुरवठा बंद राहणारे भाग :
निलगिरी चौक, चिंतामणी ज्ञानपीठ ते त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ, भारती विहार, चंद्रभागानगर, सावंतविहार, सावंत गार्डन, वंडर सिटी, कदम प्लाझा, ज्ञान्सी गार्डन, माणिक मोती, नारायणी धाम परिसर, दत्तनगर, संतोषनगर, आंबेगाव बुद्रुक गावठाण, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी रोड, धबाडी व परिसर.