Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महात्मा फुलेंचे कार्य इतिहासात अजरामर’; आमदार महेश लांडगे

पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याला भेट

पिंपरी-चिंचवड : बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून महात्मा फुले यांनी सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली मराठी शाळा सुरू केली. त्याची जबाबदारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली. त्यानंतर काळातही ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. भारताच्या इतिहासात महात्मा फुले यांचे कार्य अजरामर राहणार आहे, अशा भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे निवासस्थान ‘‘महात्मा फुले वाडा’’ येथे आमदार महेश लांडगे यांनी भेट दिली आणि अभिवादन केले.

हेही वाचा –  ‘छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक राज्यपाल भवनात करा’; उदयनराजे यांची मागणी

‘‘महात्मा फुले वाडा’’ हा समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे निवासस्थान होते. १८५२ च्या सुमारास बांधण्यात आलेल्या या वाड्याला महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे आणि अवशेष अधिनियम १९६० अंतर्गत १९७२ साली राज्य संरक्षित वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच, पुणे महानगरपालिकेतर्फे (पीएमसी) प्रथम श्रेणी ऐतिहासिक वास्तू म्हणूनही प्रमाणित केले गेले आहे. महाराष्ट्र सरकारच्या राज्य पुरातत्त्व विभागाकडून या दगडी वास्तूची देखभाल केली जात आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे, बहुजनांचे उध्दारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि थोर विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक असे देशाच्या इतिहासातील अष्टपैलू व्यक्तीमत्व आहेत. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकर घेतला. त्यांनीच भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यात सुरू केली. स्त्रियांच्या शिक्षणाच्या आद्यप्रवर्तकांचे हे आता स्मारक आहे. महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झालो. समाजासाठी काम करण्याचे नवी ऊर्जा मिळाली.

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button