ताज्या घडामोडीपुणे

‘सोमय्यांवर हल्लाप्रकरणी मी स्वत: गृहमंत्र्यांशी बोलणार; देवेंद्र फडणवीस संतापले

पुणे|  खासदार नवणीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी जात असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकाबाहेर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यासंबदर्भात बोलताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. किरीट सोमय्या हे झेड प्रोटेक्शनमध्ये आहेत तरी त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊ शकत नसतील तर राज्यात कायदा आणि सुवेवस्थाचा बोजवारा उडाला आहे, असा संताप फडणवीसांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात बोलत होते.

पोलिसांनी पोलिसांची अब्रू घालवली आहे. पोलीस सरकारच्या दबावाखाली वागत आहेत. आज लोकशाही पायाखाली तुडवली आहे. ही परिस्थिती भयावह असल्याचंही यावेळी फडणवीस म्हणाले.

तर, आता प्रश्न एवढाच आहे किरीट सोमय्या हे झेड प्रोटेक्टीव्ह आहेत. त्यांनी अधिकृतपणे पोलिसांना कळवलं होतं की मी पोलीस स्थानकामध्ये येत आहे. भेट झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितलं की ७०-८० ते १०० लोकांचा जमाव बाहेर आहे. तो जमाव माझ्यावर हल्ला करणार हे त्यांच्यातर्फे अधिकृतपणे कळवण्यात आलेलं. माझ्यावर असा हल्ला होणार आहे, पोलीस स्थानकाच्या आवारात होणार आहे. त्यामुळे आधी तुम्ही क्लिअरन्स करा मग त्यानंतर मी बाहेर जाईन, इतकं क्लिअरली सांगितल्यानंतरही पोलिसांनी यासंदर्भात कुठलीही कारवाई केली नाही. उलट जाणीवपूर्वक त्यांच्यावर दगडफेक करायला तिथल्या स्थानिक लोकांना, शिवसैनिकांना, गुंडांना परवानगी दिली. म्हणजे एकूणच पोलिसांच्या संरक्षणामध्ये गुंडगर्दी चालली आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

इतकंच नाहीतर, ‘किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी मी स्वत: यासंदर्भात गृह सचिव आणि गृहमंत्र्यांशी बोलणार आहे. त्यांना पत्र लिहिणार आहे. उद्या मागणी करणार आहे की या पोलिसांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. जे पोलीस राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागतायत. त्यांच्यासमोर त्यांच्या संरक्षणात जर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही’, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, ‘एवढचं नाही सगळी कलमं जामीनपात्र असतानाही देखील, रात्रीच्या वेळी एका महिलेला पोलीस कोठडीत जामीनपात्र गुन्ह्यामध्ये ठेवता येत नाही. माहिती असतानाही कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय पायदळी तुडवून त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात येतयं. एकूणच हा सगळा प्रकार गंभीर आहे’ असं फडणवीस म्हणालेत.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button