ताज्या घडामोडीपुणे

पती आणि सासूच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे | पती आणि सासू कडून वारंवार होणार या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कात्रज परिसरातील साईनगर मध्ये 11 डिसेंबर रोजी ही घटना घडली. अक्षता मयूर दीक्षित असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.याप्रकरणी पती मयूर दीक्षित आणि सासू रोहिणी विजय दीक्षित (रा. विठ्ठल कॉलनी, आंबेगाव) त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत विवाहितेची आई शोभा मिसाळ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मे 2021 अक्षता हीचे मयूर सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर पती आणि सासू ने वारंवार घरगुती कारणावरून वरून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तर पतीने मारहाण देखील केली होती. या सर्व त्रासाला कंटाळून अक्षता हिने कात्रज साईनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button