Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

पुणे | जुन्या कात्रज घाटात आज (मंगळवार) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी सुमारे ८:४० वाजता भिलारेवाडी वळणाजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएमटी बस (क्र. MH14/HU/6432) आणि हिरो होंडा पॅशन मोटरसायकल (क्र. MH12/FB/0348) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटरसायकलवरील आकाश रामदास गोगावले (वय २९, रा. ससेवाडी, भोर) आणि अनुष्का प्रकाश वाडकर (वय २७) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नेहा कैलास गोगावले (वय २०) ही गंभीर जखमी असून तिच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा      :          भारताचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, गिलच्या नेतृत्त्वाखाली पहिला कसोटी मालिका विजय 

अपघातानंतर पीएमटी बसचालक सुधीर दिलीप कोंडे (वय ४२, रा. आर्वी, पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button