breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम, शुक्रवारीही शाळांना सुट्टी जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी शुक्रवारी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा रेड अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच भोर, वेल्हा, मावळ, मुळशी  हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरातील सर्व शाळा तसेच खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील घाट माथ्यावरील शाळा शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही बंद राहतील, असा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी काढला आहे.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच भोर, वेल्हा, मावळ, मुळशी  हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरातील सर्व शाळा तसेच खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील घाट माथ्यावरील शाळा गुरुवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. पावसाचा जोर कायम असून  रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा    –      ‘विधानसभेच्या २२५ ते २५० जागा लढवणार’; राज ठाकरेंचं विधान 

पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड,आंबेगाव,जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा 26 जुलै 2024 रोजी बंद ठेवणे आवश्यक असल्याचे माझे मत आहे. तसेच खडकवासला धरणातून 40 हजार कयूसेक विसर्ग सुरू होत आहे.त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्‍यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे या सर्व बाबींचा विचार करता भ्रोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील

खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिपरी चिंचवड शहरातीत्न सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाटमाथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button