पुणे जिल्हा जय भगवान महासंघाची सर्वसाधारण सभा संपन्न
![General meeting of Pune District Jai Bhagwan Mahasangh held](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/51-b5fb-739a0ed84cef.jpg)
चाकण- पुणे जिल्हा जय भगवान महासंघाचे सर्वसाधारण सभा चाकण येथे मयूर हॉटेलच्या सभागृहात पार पडली.या कार्यक्रमास संस्थापक महाराष्ट्र राज्य जय भगवान महासंघ अध्यक्ष बाळासाहेब सानप उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना समाजाच्या सर्व स्तरातील घटकावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज उठवत राहण्याचे सूतोवाच केले.तसेच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या अनेक कार्याची आठवणींना उजाळा दिला.पुणे जिल्हा जय भगवान महासंघ अध्यक्ष प्रा.गणेश ढाकणे यांनी बोलताना पुणे जिल्ह्यातील सर्व घटकातील समाजाला एकत्र करण्याचा मानस बोलून दाखवला व नवीन कार्यकारिणी जाहीर केली.सर्व पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.पुणे जिल्हा जय भगवान महासंघ अध्यक्ष गणेश ढाकणे,पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद मुंडे,पिंपरी चिंचवड शहर युवा अध्यक्ष जितेंद्र बांगर,चाकण शहराध्यक्ष उत्तरेश्वर गीते,आळंदी महिला शहराध्यक्षा शामबाला भांगे नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमास पुणे जिल्हा जय भगवान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष खंडू खेडकर,जय भगवान महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत घुगे,जय भगवान महासंघाचे संघटक कैलास सानप,मावळ जय भगवान महासंघ अध्यक्ष डॉ.एकनाथ गोपाळघरे,विजय सोनवणे, गणेश ढाकणे,गजानन सोनोणे,डॉ.नारायण जायभाये,दत्तात्रय कदम,गजानन नागरे,लक्ष्मण गरकळ,सचिन बांगर,बंडू घुगे,संतोष पानसरे,दिपक खाडे,विजय आघाव,संतोष काकड,सागर सांगळे,सुनील नागरगोजे,ह.भ.प.घुगे महाराज,भिमराव शेप,चंद्रकांत सारुख, केसरबाई सारुख,लता भांडवलकर,दीपक केदार,पांडुरंग आव्हाड,प्रशांत आंधळे,मुरलीधर सांगळे,भिमराव शिरसाट,प्रा.फुंदे सर असे सर्व जय भगवान महासंघ सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहात पार पडला.