पुण्यात चार जणांच्या टोळक्याकडून मतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/rape-2.jpg)
पुणे | सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुणे शहर हादरले आहे. स्वारगेट परिसरातून एका मतिमंद तरुणीचं अपहरण करत चार जणांच्या टोळक्याने तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केलाय. बलात्काराची ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करीत चार जणांना अटक केली आहे.आदित्य पवार (वय 19), दुरवेश जाधव (वय 36), श्रीकांत सरोदे (वय 36), आणि आशिष उर्फ रड्या मोहीते (वय 18) अशी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हा प्रकार शुक्रवारी घडला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वरील चारही आरोपींनी स्वारगेट परिसरातून पीडित तरुणीचे अपहरण केले. तिला जनता वसाहत परिसरातील एका बंद खोलीमध्ये घेऊन गेले आणि त्यानंतर चारही जणांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान या घटनेची कुणकुण पोलिसांना लागल्यानंतर त्यांनी त्या प्रकरणाची अधिक माहिती घेत या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या चारही आरोपींना अटक केली आहे. दत्तवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.