ताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील पूरग्रस्तांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत

पुण्यातील पूर स्थितीसाठी कारणीभूत ठरलेली अतिक्रमण देखील काढण्यात येणार

पुणे : गेल्या आठवड्यात पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाले. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. धरणातून सोडलेल्या या पाण्यामुळे पुण्यातील बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली. पुण्यातील अनेक घरं, दुकाने आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. सध्या पुणेकर या भीषण स्थितीतून सावरत आहेत. त्यातच आता पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पुण्यातील पूरग्रस्तांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबद्दलचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुण्यामध्ये आलेल्या पुरात ज्यांचे कोणाचे नुकसान झाले आहे, त्यातील प्रत्येक कुटुंबाला 25 हजार रुपयांची मदत करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, असेही सुहास दिवसे यांनी म्हटले.

त्यासोबतच पुण्यातील पूर स्थितीसाठी कारणीभूत ठरलेली अनेक अतिक्रमण देखील काढण्यात येणार आहेत. याबद्दलची सर्व रुपरेषा नव्याने आखली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईचे निकषही शिथिल करण्यात आले आहेत. जर पूरस्थितीत पुराचे पाणी दोन दिवस घरात साचून राहिले असेल तरच मदत मिळेल, असे आदेश महसूल मंत्र्‍यांनी दिले होते. पण आता ही अट शिथिल करण्यात आली आहे. त्यासह पुण्यातील पूरग्रस्त मदतीची रक्कम प्रतिकुटुंब पाच हजारांवरून दहा हजार रुपये करण्यात आली आहे. याशिवाय नुकसानग्रस्तांमध्ये दुकानदार आणि टपरीधारक यांचाही समावेश करण्यात आला आहे. नुकतंच याबद्दलचा नवीन आदेशही प्रसिद्ध करण्यात आला.

एकूण किती मिळणार मदत?
पुण्यात पुराचे पाणी शिरलेल्यांना प्रतिकुटुंब पाच हजारांऐवजी दहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागाने याबद्दलची घोषणा केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला 25 हजार रुपयांची मदत करण्याचे निर्णय घेतला आहे.

स्थानिक रहिवासी, शिधापत्रिकाधारक, मतदारयादीत नाव असलेले आणि नोंदणीकृत परवानाधारक दुकानदार आणि टपरीधारकांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा कमाल 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button