Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे विमानतळावरून दुबई-अबू धाबी विमान सेवा युद्धजन्य परिस्थितीमुळे रद्द

पुणे: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबू धाबी, दुबईसाठी होणारी चार आंतरराष्ट्रीय उड्डाणे शनिवारी (दि. 28) रोजी रद्द करण्यात आली. त्यामुळे पुण्याहून दुबई, अबू धाबी जाणाऱ्या प्रवाशांची नियोजित कामे रखडली.

हेही वाचा – राऊळगाव स्फोटात 17 जणांचा मृत्यू,18 कामगार जखमी, मृतांच्या वारसांना पाच लाख 

अचानक तणावपूर्ण परिस्थितीमुळे शनिवारी पुण्यातून अबुधाबी आणि दुबई भागात जाणारी चार विमाने रद्द केली. यात स्पाईस जेट कंपनीचे (फ्लाईट क्रमांक -एसजी 51) पुणे ते दुबई, रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी होणारे उड्डाण रद्द केले. तसेच एअर इंडिया एक्स्प्रेसचे (फ्लाईट क्र. आयएक्स 283) पुणे ते अबू धाबी, रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी होणाऱ्या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. याशिवाय इंडिगो (फ्लाईट क्र. 6ई 1484/1483 दुबई-पुणे-दुबई, रात्री 10.30 वाजता येणारे आणि 1 मार्च रोजी पहाटे 1 वाजून 30 मिनिटांनी दुबईकडे जाणारे विमान रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांची तिकीट परतावा किंवा युद्धजन्य स्थिती संपल्यानंतरच्या पुढील तारखांचे पर्यायी उड्डाणांचे पर्याय दिले जात आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

मध्यपूर्वेतील अस्थिर परिस्थितीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव अबू धाबी, दुबईला होणारी चार उड्डाणे शनिवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही विमानतळावर प्रवाशांच्या मदतीसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी आपल्या संबंधित एअरलाईनशी संपर्क साधून फ्लाईटचे स्टेटस तपासावे, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही. प्रवाशांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे.

-संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

परीक्षांचा वेळ असल्यामुळे सध्या या देशांमध्ये गेलेल्या पर्यटकांची संख्या नक्कीच कमी असणार आहे. उद्योजक, नोकरदार यांची संख्या अधिक असेल. आमच्यापर्यंत सध्या अडकलेल्या अधिकृत नागरिकांची आकडेवारी आलेली नाही. मात्र, युद्धामुळे या देशांमध्ये अडकलेल्या सर्वांवर आम्ही लक्ष ठेवून आहे. त्या देशांमध्ये मदतीसाठी आम्हाला कोणी संपर्क केला तर तत्काळ त्यांना मदत करू. त्यासंदर्भातील नियोजन सुरू आहे.

-नीलेश भन्साळी, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजन्सीज असोसिएशन (टाप) पुणे

युद्धजन्य परिस्थितीमुळे गल्फ देशांतील विमान सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आमचे पुण्यातून जाणारे 25 आणि तिकडून येणारे 25 प्रवासी सध्या अडकले आहेत, ही परिस्थिती अनपेक्षित असली, तरी आम्ही तातडीने पावले उचलली आहेत. आम्ही अडकलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या थेट संपर्कात आहोत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांच्या राहण्या-खाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आमचे बारकाईने लक्ष असून, पर्यायी मार्गांचाही विचार सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेची आम्ही पूर्ण जबाबदारी घेत आहोत, त्यामुळे कुटुंबीयांनी काळजी करू नये. विमान सेवा रद्द झाल्यामुळे आव्हाने निर्माण झाली आहेत, परंतु आमच्यासाठी प्रवाशांचे हित आणि सुरक्षा सर्वतोपरी आहे. सर्व प्रवासी सुखरूप परत येईपर्यंत आमचे नियोजन आणि प्रयत्न सुरूच राहतील.

-सुनील लोंढे, महाव्यवस्थापक, ट्रेडविन ट्रॅव्हल्स लि.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button