breaking-newsपुणे

Drowning : परीक्षा संपल्यानंतर मित्रासोबत पोहायला गेलेला तरुण तलावात बुडाला

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

परीक्षा संपताच मित्रांसोबत पोहायला गेलेला विद्यार्थी तलावात बुडाल्याची घटना समोर आली आहे. त्याला बाहेर काढण्याचे शोधकार्य सुरू आहे. ही घडना मंगळवारी (दि. 3) आमराई तलावात घडली आहे. तो विद्यार्थी पुण्यातील के. जे. इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला होता.

महेश रमेश शेंडगे (वय 22) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. पुण्यातील के. जे. इन्स्टिट्यूटमध्ये तो डिप्लोमाचं शिक्षण घेत होता. परीक्षा संपल्याने सात-आठ मित्रांच्या सोबतीने तो काल पोहण्यासाठी गेला होता. पुरंदर तालुक्यातील भिवरीमध्ये असलेल्या आमराई तलावात मित्र पोहत होते. दुपारी तीन वाजताच्या सुमारास महेश तलावातील पाण्यात बुडाल्याचं मित्रांच्या लक्षात आलं.

त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर काल रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होतं. परंतु रात्रीच्या अंधारात शोधकार्यात अडथळा येत असल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळी सहा वाजल्यापासून शोधकार्य पुन्हा सुरु करण्यात आलं आहे.

महेश मूळचा दौंड तालुक्यातील मलठन या गावचा आहे. महेश बुडाल्यामुळे शेंडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तलावात महेशचा शोध घेतला जात असून सासवड पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button