Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना उद्याच वेतन मिळणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर पुनर्विकासासाठी १४ हजार ४५ कोटी रूपये मंजूर

कोल्हापूर | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. “सर्व शासकीय कर्मचारी व पेन्शनधारकांचे वेतन उद्याच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे,” अशी घोषणा करत अजित पवारांनी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दिलासा दिला आहे. वित्त विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला असून, कोणत्याही कर्मचाऱ्याला आर्थिक ताण जाणवू नये, यासाठी सरकारने ही आगाऊ पावले उचलली आहेत.

अजित पवार यांनी कोल्हापुरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला आणि अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. त्यात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या पुनर्विकासासाठी तब्बल 1,445 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा विशेष लक्षवेधी ठरली. या प्रकल्पात मंदिर परिसराचे संवर्धन, मार्केट डेव्हलपमेंट, लँडस्केपिंग, आणि आधुनिक सुविधा यांचा समावेश आहे. यासाठी पुरातत्व खात्याशीही सल्लामसलत सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा       :          Breaking New | भारताला नवीन धनुर्विद्या जागतिक विजेती!

अजित पवार यांच्याकडून कोल्हापुरासाठी महत्त्वाचे निर्णय:

1. कोल्हापूर महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी ५ एकर जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश.
2. केसवराव भोसले नाट्यगृहाच्या कामासाठी निधी देण्याची ग्वाही.
3. अंगणवाडी इमारतींसाठी १५ लाखांपर्यंत आर्थिक मदत देणार.
4. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणातील जलतरण तलावाच्या निकृष्ट कामांवर नाराजी; चौकशीचे आदेश व कारणे दाखवा नोटीस.
5. कोल्हापूर विमानतळासाठी तीन किमी धावपट्टीसाठी नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा.

‘सारथी’ उपकेंद्रासाठी १७५ कोटींचा निधी मंजूर..

महापालिकेतील निकृष्ट कामांबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी कठोर भूमिका घेतली. “कामाच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड होणार नाही. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका आणि त्यांच्याकडून खर्च वसूल करा. या विषयात राजकारण नको,” असा ठाम इशारा त्यांनी दिला. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेली भूमिका आणि घेतलेले निर्णय निश्चितच सकारात्मक वाटचालीकडे घेऊन जाणारे आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button