breaking-newsपुणे

#Coronolockdown:नियमांचे पालन न केल्यामुळे पुण्यातील 9 दारुच्या दुकांनावर गुन्हे दाखल

पुणे : राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने राज्यावर आता आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 मे नंतर राज्य सरकारने तिन्ही झोनमध्ये मद्य विक्रीस परवानगी दिली होती. पण पुण्यातील मद्य विक्री दुकानांनी दारु विक्रीसाठी परवानगी देताना दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकूण 9 दारुच्या दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

ही दुकानं विश्रामबाग, चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 तर हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 7 दुकानं आहेत. परवानगी देताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे आदी नियम आणि अटी घालून दिल्या होत्या. मात्र दुकान मालकांनी दिलेल्या नियम आणि अटींचे भंग करून कोरोनाचा संसर्ग पसरवण्याची कृती केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button