breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाला कोरोना, 35 दिवस मृत्यूशी झुंज देत कोरोनाची लढाई जिंकली

पुणे: जगभरात वयाच्या प्रत्येक टप्प्यातील लोक कोरोनाचा सामना करत आहेत. मात्र, पुण्यात  मुदतीआधी जन्माला येतानाच कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका बाळाने तब्बल 35 दिवस मृत्यूशी लढा दिला आहे. 1.8 किलो वजन असलेल्या या बाळावर भारती रुग्णालयात उपचार करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे यापैकी 22 दिवस बाळ व्हेंटिलेटरवर होते. त्यानंतर या बाळाने कोव्हिडसोबतची लढाई जिंकलेली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिलेली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाने 35 दिवस संघर्ष करत कोरोनावर मात केल्याचा चमत्कार पुण्यातील भारती रुग्णालयात घडला आहे. गर्भवती महिला या उच्च जोखीम गटात येत असल्याने या काळात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागलेले होते. त्यातच आई कोव्हिड-19 पॉझिटीव्ह असल्याने त्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत होते. हा आजार आईकडून बाळास जाईल की नाही याबाबत असलेले कमी माहिती यामुळे ही भीती वाढली आहे.”

‘बाळाला जन्मतःच श्वास घेण्यास त्रास’

“कोरोना व्हायरस-2 हा आईकडून बाळास होण्याचे प्रमाण जगभर वाढत आहे. परंतु असे अतिशय कमी रुग्ण आहेत. सुदैवाने जगभर बहुतांश वेळा कोव्हिड-19 पॉझिटीव्ह आईचे बाळ हे कोणत्याही लक्षणाशिवाय जन्मलेले आहे. पण कधी कधी प्रत्येक गोष्टीत अपवाद असतात. अशीच घटना पुण्यात एका खासगी रुग्णालयात घडली आहे. एका आईने मुदतीच्या आधी बाळाला जन्म दिला होता. त्याचे जन्माच्या वेळी वजन फक्त 1.8 किलो होते आणि जन्मत:च त्यास श्वास घेण्यास त्रास होत होता. ऑक्सिजन देण्याची गरज होती आणि हे बाळ तपासणीअंती कोव्हिड-19 पॉझिटीव्ह आले,” अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

https://m.facebook.com/MurlidharKMohol/posts/3305663829659389?refsrc=http%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fpune%2Fbaby-infected-with-corona-while-birth-recovered-after-treatment-in-pune-257731.html

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button