breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus | प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचं आवाहन, पुण्यात मात्र उलट चित्र, पुणे स्टेशनवर तुफान गर्दी

पुणे | कोरोनाशी लढा देण्यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून केल जात असताना, पुण्यातील रेल्वे स्थानकात वेगळंच चित्र आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर खचाखच गर्दी आहे. सुट्ट्यांमुळे अनेकजण गावी जात आहेत. त्यामुळे रेल्वे पकडण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली आहे. मात्र हीच गर्दी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे या गर्दीतून तो आणखी बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे पिंपरी 12 आणि पुणे 9 मिळून 21 रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातच आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात सर्वाधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.असं असताना जे कामानिमित्त पुण्यात राहतात, ते आता शनिवार आणि रविवारी साधून पुणे सोडणे पसंत करत आहेत. परिणामी रेल्वे स्टेशन खचाखच भरलं आहे. मात्र त्यामुळे कोरोना बळावण्याचा धोका आणखी वाढला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button