breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: पुण्यात लग्नामुळे कोरोनाचा हाहाकार, एकाच कुटुंबातील 17 जण पॉझिटिव्ह

पुणे: पुण्यात कोरोनाचे धक्कादायक आकड्यांचे सत्र वाढतच चालले आहे. अशात दौंड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. दौंड तालुक्यातील कासुर्डीमधल्या कोरोना पॉझिटिव्ह नवरा-नवरीमुळे एकाच कुटंबासह नातेवाईक मिळून तब्बल 17 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. काही दिवसांपूर्वीच या जोडप्याचं लग्न झालेलं होतं.

त्यांना त्रास जाणवू लागल्याने कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील आज सासरच्या कुटुंबातील लोकांच्या केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल आज आला आहे. दौंड तालुक्यातील एकाच दिवसांत 27 जण कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. कासुर्डी इथल्या नवरदेवाचे उरळी कांचन इथल्या नवरी मुलीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर नवरा-नवरीला त्रास होऊ लागल्यानं त्यांची तपासणी करण्यात आली होती. ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सासरच्या 34 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये जवळच्या कुटुंबातील 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची निष्पन्न झालेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button