breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात दिवसभरात आढळले ८६ कोरोना बाधित रुग्ण
पुणे शहरात दिवसभरात ८६ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळं जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २०२९ रुग्ण संख्या झाली आहे. तर आज सात करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर ११८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १४ दिवसानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ५२ जणांना घरी सोडण्यात आले आहे.