breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना, हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

कसबा विश्रामबाग आणि भवानी पेठ क्षेत्रातील पावसाळी समस्यांवर त्वरित उपाययोजना आवश्यक

पुणे : कसबा मतदारसंघाच्या कसबा, विश्रामबाग व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. सदरील भाग हा दाट लोकवस्ती, मुख्य बाजार पेठ तसेच निवासी भाग, असा संमिश्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा होत असतो. महानगर पालिकेने कंटेनर मुक्त कचरा व्यवस्थापन केलेले असले तरी सदरील जागांवर अजून कचरा टाकला जात आहे. व सदरील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्या उद्भविण्याची शक्यता आहे. त्यावर तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी कसबा विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी पुणे महानगरपालिका जनरल सहा. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांच्याकडे केली.

कसबा, विश्रामबाग आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ६ प्रभागांच्या विविध प्रश्नांसंदर्भात रासने यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळांने पुणे महापालिका जनरल सहायक आयुक्त श्री. रवींद्र बिनवडे आणि अतिरिक्त आयुक्त श्री. पृथ्वीराज बी. पी. यांची भेट घेतली. यावेळी “कचरा मुक्त कसबा मतदार संघ ” संकल्पना राबवण्यासाठी महानगर पालिकेने सहकार्य करण्याची विनंती रासने यांनी केली. तसेच कसबा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडीचीही समस्या सोडविण्याची मागणी श्री. हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाकडे केली.

हेही वाचा    –   पिंपरी-चिंचवडमधील हातगाडी, फेरीवाल्यांसाठी ‘हॉकर्स झोन’ द्या!

दरम्यान, पावसाळी समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी तसेच प्रभागातील काही प्रलंबित समस्या लवकर सोडवण्यासाठीचे निवेदन देखील देण्यात आले. पावसाळी गटार लाईन स्वच्छ नसल्यामुळे विविध ठिकाणी पावसाचे पाणी तुंबून नागरिकांच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये शिरत आहे. परिणामी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच ड्रेनेज लाईन साफ न केल्यामुळे विविध ठिकाणी ड्रेनेज तुंबणे आणि त्याचे पाणी उलटे नागरिकांच्या घरात जाणे तसेच धोकादायक झाडे, फांद्या पडणे अशा समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी पालिकेने योग्य ती कारवाई करण्याची मागणी रासने यांनी केली आहे.

यावेळी कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, तेजेंद्र कोंढरे, योगेश समेळ, राजेश येनपुरे, मनिषा लडकत, गायत्रीताई खडके, उदय लेले, राजू परदेशी, छगन बुलाखे, विष्णूआप्पा हरिहर, विजयालक्ष्मी हरिहर, अर्चना पाटील, सुनील खंडागळे तसेच कसबा मतदारसंघाचे सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, चंद्रकांत पोटे, उमेश चव्हाण, कसबा मतदारसंघ महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनीताई पवार, तसेच कसबा मतदारसंघातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button