Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना केल्या सूचना, म्हणाले…!

पुणे : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, यासाठी काय करावे याचा सात कलमी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना राबविण्याच्या सूचना केल्या. पुढील शंभर दिवसांसाठी हा उपक्रम असून, याचा आढावा १५ एप्रिलला घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक दूरभाषप्रणालीद्वारे संवाद साधला. यामध्ये नागरिकांचे दैनदिन जीवन सुकर व्हावे, यासाठी १०० दिवसांच्या या कालावधीत किमान दोन सुधारणा, नावीन्यपूर्ण उपक्रम कार्यालयात राबविण्यात यावेत, अशा सूचना केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

हेही वाचा    –      ‘‘मावळ माझा’’चे संपादक विशाल विकारी यांना राज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान

‘पुढील १०० दिवसांच्या कालावधीत सरकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना कोणतीही असुविधा होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना करताना कार्यालयांची संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल, अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करावे. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका, खराब आणि वापरात नसलेली वाहने हद्दपार करा,’ अशा सूचना या बैठकीत फडणवीस यांनी केल्या.

‘कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहांची स्वच्छता याकडे गांभीर्याने पाहावे. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहितीदेखील फलकांवर स्पष्टपणे देण्यात यावी, लोकशाही दिनासारखे उपक्रम सुरू करावेत,’ अशा सूचना त्यांनी दिल्याचे पालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना

विभाग, कार्यालयाचे संकेतस्थळ अद्ययावत करा

शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहिम राबवा

नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढा

उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या

शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना भेटी द्याव्यात

शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button