breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पाला केंद्र सरकारचा बूस्ट

पुणे : शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पाला केंद्र सरकारचा बूस्ट मिळाला आहे. केंद्र सरकारच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी ६९० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातून वाहणा-या मुळा-मुठा नदीकाठचे ४४ किमी लांबीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पास २०१८ ला मान्यता मिळाली असून, यासाठी ४ हजार ७२७ कोटी रुपये खर्च वेणार आहे.

प्रकल्पाचे काम ११ टप्प्यांत करण्यात येणार असून, ११ पैकी ३ टप्प्यांचे काम प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत आहे. एका टप्प्यासाठी येणारा ७०० कोटी रुपये खर्च महापालिकेच्या निधीतून करण्याचा व उर्वरित खर्च पीपीपी तत्त्वावर करण्यात येणार आहे.

हेही वाचा –  पुणे म्हाडाच्या अध्यक्ष पदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती

प्रकल्पातील टप्पा क्र. ९ मध्ये संगमवाडी ते बंडगार्डन या ३.७ किलोमीटर लांबीचे नदीं सुशोभीकरणाचे काम बी. जे. शिर्के कंपनीकडून केले जात आहे. हे काम ६५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला आहे, तसेच, रप्पा क्र. १० व ११ बंडगार्डन ते मुंढवा चादरम्यानचे काम पीपीपी तत्त्वावर ने. कुमार या कंपनीकडून केले जात आहे.

हे काम ५.३ किलोमीटर लांबीचे असून, यामध्ये कोरेगाव पार्कच्या बाजूने बंडगार्डन ते मुंस्वा यादरम्यान ३० मीटर रुंदीचा रस्ता केला जात आहे. या टप्प्याचे काम आत्तापर्यंत २५ टक्के झाले असून, नदी सुशोभीकरण प्रकल्पाचे सरासरी काम ५० टक्के पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पासाठी केंद्राकडून ४४०० कोटी रुपयां रुपये निधी मिळावा, यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात होते या प्रयत्नांना यश आले असून, केंद्रीय अर्थसंकल्पात मुळा-मुठा नदी सुधारणेरवठी ६९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात एक्सा (ट्विटर) प्रतिक्रिया देत केंद्र सरकतचे आभार मानले आहेत. पुणे मेट्रो आणि मुळा-मुठा नदीसाठी दिलेल्या निधीचा निश्चित शहराच्या विकासाला फायदा होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button