breaking-newsताज्या घडामोडीपुणे

Big News : कोरोना व्हायरसवर पुण्यात लस तयार?

पुणे |महाईन्यूज|

जगभरात हैदोस घातलेल्या कोरोनाने भारतात शिरकाव केला आहे. कोरोना व्हायरस जगातील 100 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यातच त्यावर आता पुण्यातल्या एका संस्थेनं या व्हायरसवर लस शोधल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता लोकांना घाबरण्याची गरज नसल्याचं म्हटलं जात आहे.

पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेनं या व्हायरसवर लस शोधली असल्याचा दावा केला आहे. या प्राणघातक आजारावर लस आपण विकसित केली आहे अशी माहिती या संस्थेनं दिली आहे. ही लस व्हायरसच संक्रमण रोखण्यासाठी कमी वेळेत रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असल्याचा दावा या संस्थेनं केलाय.

सध्या प्राथमिक स्तरावर चाचण्या सुरू करण्यात आल्यात. ही लस रोग प्रतिकारक शक्ती वाढवून एक प्रकारचे सुरक्षा कवच तयार करत असल्याचा दावा या संस्थेनं केला आहे. पुढच्या आठवड्यात उंदीर आणि माकडावर त्याच्या चाचण्या केल्या जातील. मानवी चाचण्या करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button