TOP Newsताज्या घडामोडीपुणे

कामशेतमध्ये आमदार शेळके, सभापती वायकर यांच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

पुणे | मावळचे आमदार सुनील शेळके आणि जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांच्या फंडातून कामशेत येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. हा सोहळा कामशेत शहरामध्ये भव्य मिरवणूक काढून ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.यावेळी SRP राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे,माजी जिल्हा परिषदसदस्यआतिष परदेशी,तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, खरेदीविक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे,ग्रा.पं. सदस्य संदीप आंद्रे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावचे संचालक बाळासाहेब गायकवाड,माजी सरपंच तानाजी दाभाडे,आनंद टाटीया,विष्णू गायखे,सुरेश वाघवले, संतोष राक्षे,विजय दौंडे, किशोर सातकर,प्रकाश आगळमे, विशाल वहिले,विठ्ठल मोहिते,अनिल मोहिते,गजानन शिंदे,महेश मालपोटे,मंगेश राणे,सुनील काजळे,बाळासाहेब काजळे, सुनील दंडेल,सुहास वायकर,सोनू पिंजण,वरुण वहिले,राजू आगळमे आदी उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी सभापती बाबुराव आप्पा वायकर यांचे कौतुक केले व केलेला कामाविषयी समाधान व्यक्त करून आभार देखील मानले आणि आप्पा तुम्ही एकट्या कामशेत शहरासाठी 3.5 कोटींची विकासकामे करताना कुठलाही दुजाभाव केला नाही अश्या शब्दांत स्तुतिसुमने उधळली.

आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून कामशेतच्या विकासासाठी अंतर्गत रस्ते,बंदिस्त गटर, सभामंडप याकरता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला व येणाऱ्या काळामध्ये कामशेत शहराची वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जलजीवन मिशन अंतर्गत 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्यामध्ये पाण्याची टाकी,फिल्टर प्लांट व पाईप लाईनसाठी निधी उपलब्ध करून दिला तसेच मा.सभापती आतिष परदेशी यांनी त्यांचे जिल्हा परिषद कार्यकाळात मंजूर झालेल्या 10 लक्ष रुपयांच्या महिला सांस्कृतिक भवनचे उदघाटन देखील करण्यात आले.

यावेळी कामशेत नगरीचे सरपंच रूपेश गायकवाड, यांनी आमदार सुनील शेळके व सभापती बाबुराव आप्पा वायकर यांचे ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करून आभार मानले. यावेळी उपसरपंच निलेश दाभाडे,ग्रा.पं. सदस्य दत्ता शिंदे,अभिजित शिनगारे,परेश बरदाडे,विमल पडवकर,अनिता गायखे, वैशाली इंगवले, सारीका शिंदे,विजय दौंडे, संतोष काळे,दत्तात्रय रावते,संजय पडावकर,सतीश इंगवले यांनी आयोजन केले.

दरम्यान, प्रास्ताविक निलेश दाभाडे यांनी केले तर कोंडीबा रोकडे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button