Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

बजाज पुणे ग्रँड टूरने रचला आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेतला नवा इतिहास

पुणे  : ‘पुणे ग्रँड टूर–२०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा आज अंतिम टप्पा पूर्ण होताच ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. उत्कृष्ट नियोजन, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि पुणे व पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही स्पर्धा देश-विदेशातील क्रीडाप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली.

या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण भारत व भारतीय उपखंडात ‘स्टार स्पोर्ट्स’ आणि ‘जिओ हॉटस्टार’वर, तर युरोपसह जगातील ७० हून अधिक देशांमध्ये ‘एचबीओ मॅक्स’ आणि ‘डिस्कवरी प्लस’ या आंतरराष्ट्रीय माध्यमांद्वारे करण्यात आले. या जागतिक थेट प्रक्षेपणातून पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, विस्तीर्ण व सुशोभित रस्ते, ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक वारसा, मराठी नाटक व संगीत परंपरा, क्रीडा संस्कृती, पर्यावरणपूरक उपक्रम आणि आधुनिक पायाभूत सुविधांचे प्रभावी दर्शन जगभरातील प्रेक्षकांना घडले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे–बालेवाडी येथून सुरू झालेला अंतिम टप्पा पाषाण, एनसीएल मैदान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, राजीव गांधी पूल, रक्षक चौक, काळेवाडी, डांगे चौक, संत तुकाराम महाराज पूल, स्वामी विवेकानंद चौक, भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणी नगर, पीसीएनटीडीए, स्पाईन रोड, नळस्टॉप, लक्ष्मीनारायण चौक, सेव्हन लव्हज चौक, टर्फ क्लब, नॅशनल वॉर मेमोरियल, साधू वासवानी चौक, शनिवारवाडा, साखर संकुल, एफ.सी. रोड आणि जंगली महाराज रोड मार्गे बालगंधर्व रंगमंदिर येथे समारोपाला पोहोचला.

हेही वाचा –‘दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, सुमारे ४३ लाख रोजगारनिर्मिती’; उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

या अंतिम टप्प्यात पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतील नागरिकांनी तब्बल ९९.१५ किलोमीटरच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलपटूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे १४ लाख नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून खेळाडूंना केलेले स्वागत हे जागतिक सायकल स्पर्धांच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले असून, नागरिकांच्या सहभागाच्या दृष्टीने नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे.

स्पर्धा मार्गावरील चौकांचे सुशोभीकरण, स्वच्छता, नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था, हरित पट्ट्यांची सजावट, एलईडी स्क्रीन, सांस्कृतिक सादरीकरणे आणि नागरिकांचा उत्साही सहभाग यामुळे पुणे शहराचे सौंदर्य थेट प्रक्षेपणातून जगभर पोहोचले. समालोचकांनी पुण्याचा इतिहास, सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिक वाटचाल ओघवत्या शैलीत मांडली. ऐतिहासिक शनिवारवाडा, मराठी सांस्कृतिक ओळख जपणारे बालगंधर्व रंगमंदिर, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, लाल महाल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जंगली महाराज रोडवरील पाताळेश्वर मंदिर आदी स्थळांची माहिती स्पर्धेदरम्यान देण्यात आल्याने पुण्याचा वारसा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम जागतिक व्यासपीठावर अधोरेखित झाला.

या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने पुण्यात दाखल झाले होते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवक आणि विविध शासकीय विभागांनी उत्कृष्ट समन्वयाने काम केले. कोणताही अनुचित प्रकार न घडता स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल जागतिक सायकल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

‘पुणे ग्रँड टूर–२०२६’ मुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक बळकट झाली असून, क्रीडा पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था, सांस्कृतिक प्रचार आणि शहराच्या ब्रँडिंगला मोठी चालना मिळाली आहे. जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांनी या स्पर्धेच्या माध्यमातून पुण्याचे वैभव अनुभवले, अशी भावना नागरिक, क्रीडाप्रेमी आणि आयोजकांकडून व्यक्त होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button