TOP Newsताज्या घडामोडीपुणे

बारामती, फलटण, इंदापूरमधून फळबाजारात द्राक्षांची आवक

पुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात हंगामपूर्व आंबट गोड द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. बाजारात दिवसाआड दोन ते अडीच टन द्राक्षांची आवक सध्या होत आहे. बारामती, फलटण, इंदापूर भागातून मार्केट यार्डातील फळबाजारात दिवसाआड दोन ते अडीच टन द्राक्षांची आवक होत आहे. द्राक्षांचा हंगाम डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात सुरू होतो. गेल्या काही वर्षांपासून बाजारात हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील फलटण भागातून हंगामपूर्व द्राक्षांची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात सध्या सुरू झाली आहे. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत द्राक्षांचा हंगाम सुरू असतो. उन्हाळय़ात द्राक्षांची गोडी वाढते. बाजारात आवक झालेल्या हंगामपूर्व द्राक्षांची प्रतवारी चांगली असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील द्राक्ष व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.  बाजारात आवक झालेली द्राक्षे सोनाका आणि तास-ए-गणेश जातीची आहेत. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका पुणे जिल्ह्यातील द्राक्षांना एवढा बसला नाही. त्यामुळे द्राक्षांची प्रतवारी चांगली आहे. घाऊक बाजारात द्राक्षाच्या नऊ किलो पेटीचे दर प्रतवारीनुसार ८०० ते १२०० रुपये आहेत. प्लास्टिकच्या पनेटच्या पाच किलोच्या पेटीचे दर प्रतवारीनुसार ५०० ते ८०० रुपये आहेत, असे त्यांनी सांगितले.

यंदा द्राक्षे मुबलक द्राक्षांचा हंगाम सुरू होण्यास आणखी एक ते सव्वा महिन्यांचा कालावधी आहे. द्राक्षांचा हंगाम जानेवारी ते मे महिन्यांपर्यंत सुरू असतो. हंगाम सुरू झाल्यानंतर द्राक्षांची आवक टप्याटप्याने वाढून ५० टनांपर्यंत पोहोचते. यंदा द्राक्षांची लागवड चांगली झाली असून हंगामात द्राक्षांची आवक मुबलक प्रमाणावर होईल.

सध्या बाजारात हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. किरकोळ बाजारात द्राक्षांना फारशी मागणी नाही. मात्र, महाबळेश्वर, लोणावळा, कोकणातून फळ विक्रेत्यांकडून द्राक्षांना चांगली मागणी आहे. पर्यटनस्थळांवर द्राक्षांना चांगली मागणी असते. पुण्यातील फळबाजारातून पर्यटनस्थळावर द्राक्षे विक्रीस पाठविली जातात. गुजरातमधील बडोदा, अहमदबाद, सूरत  तसेच गोव्यात द्राक्षे विक्रीस पाठविण्यात आली आहेत.

– अरविंद मोरे, द्राक्ष व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button