ताज्या घडामोडीपुणे

समाज विकास विभागाच्या 131 मिळकतीचे करारनामे नियमित करण्यासाठी मान्यता

पुणे | महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत समाज विकास केंद्र, बालवाडी, अभ्यासिका, व्यायामशाळा, सांस्कृतिक भवन, बालभवन आदी वास्तू विविध संस्थांना चालविण्यास दिलेल्या १३१ वास्तूंचे सन २००८ च्या मिळकत किंवा जागा वाटप नियमावलीनुसार करारनामे नियमित करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.माध्यमांशी बोलताना रासने म्हणाले, ‘समाज विकास विभागाच्या १३१ मिळकती विविध संस्थांच्या ताब्यात आहेत. या ठिकाणांचा अंगणवाडी, अभ्यासिका, ग्रंथालय, महिला स्वयंरोजगार, ज्येष्ठ नागरिक संघ. विरंगुळा केंद्र असा वापर केला जातो. या संस्थांबरोबर महापालिकेने २० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार केलेले आहेत. परंतु, त्यावर करार संपुष्टात येणारा कालावधी मात्र नमूद केलेला नाही. तसेच काही करारनाम्यांवर स्वाक्षरी करण्यात आलेली नाही किंवा परिपूर्ण नाहीत.’

रासने पुढे म्हणाले, ‘मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून वास्तूंचे आवश्यकतेनुसार मूल्यांकन करणे, थकित भाडे आकारणी करणे, महापालिकेच्या संयुक्त प्रकल्पांसाठी ३० वर्षे भाडेकराराची मुदत देणे, व्यावसायिक किंवा अन्य वापरांसाठी वास्तूंचा उपयोग होत असेल, करारनाम्यातील अटींचा भंग होत असेल तर सदर वास्तू परत ताब्यात घेणे, नोंदणीकृत संस्थांकडून संचालनासाठी अर्ज मागविणे, देखभाल दुरुस्तीसाठी आयुक्तांच्या पूर्वपरवानगीने माफक शुल्क आकारणे अशा विविध कारणांसाठी या १३१ संस्थांबरोबरचे करारनामे नियमित करणे आवश्यक आहे. त्याबाबतच्या कार्यवाहीसाठी समाज विकास विभागाला परवानगी देण्यात आली आहे.’

क्षेत्रिय कार्यालयानुसार समाज विकास विभागाकडील वास्तू/मिळकती

बिबवेवाडी (७)
भवानी पेठ (१३)
औंध बाणेर (१२)
कोथरुड बावधन (१४)
ढोले पाटील रोड (४)
वानवडी रामटेकडी (५)
नगर रोड वडगावशेरी (३)
येरवडा कळस धानोनी (२८)
शिवाजीनगर घोले रोड (१७)
कसबा विश्रामबागवाडा (१०)
सिंहगड रस्ता (६)
हडपसर मुंढवा (१)
वारजे कर्वेनगर (७)
धनकवडी सहकारनगर (४)
अशा एकूण १३१ मिळकती आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button