यूपीएससीच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-50-3-780x470.jpg)
पुणे : यूपीएससीच्या अध्यक्षपदी निवृत्त आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती सुदान गुरुवारी (दि.०१) ऑगस्ट रोजी अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी वैयक्तिक कारण पुढे करत राजनामा दिला होता. यानंतर आता प्रीती सुदान यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्करसमवेत सामंजस्य करार
निवृत्त अधिकारी प्रीती सुदान यांना प्रशासकीय कामांचा जवळपास ३७ वर्षांचा अनुभव आहे. प्रीती सुदान आंध्रप्रदेश केडरच्या १९८३ च्या बॅचचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती कलम ३१६ अंतर्गत करण्यात आली आहे. त्यांनी यूपीएससी सदस्य म्हणूनही काम केले आहे. आता त्या एप्रिल २०२५ पर्यंत यूपीएससीच्या अध्यक्षपदी राहतील.