breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात सिरम संस्थेच्यासमोरील आकाशवाणीत अग्नितांडव

पुणे |महाईन्यूज|

पुण्यातील सिरम संस्थेच्या समोरील आकाशवाणीला मोठी आग लाागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिरम संस्थेसमोर असलेल्या सोलापूर रोडवरील आकाशवाणीची मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत ही आग लागली आहे. गवताला आग लागल्यामुळे आगीने रौद्ररुपधारण केले आहे. स्थानिकांना तातडीने घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, मोकळ्या जागेत आग लागली आणि वारा जास्त असल्यामुळे आग पसरत चालली आहे. अग्निशमन दलाचे जवान योग्य ती खबरदारी घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button