Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांची ‘एफटीआयआय’ (FTII) पुणे ला शैक्षणिक भेट

पुणे : आळंदी येथील एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या ‘MITRONICS CLUB च्या वतीने भारतातील अग्रगण्य चित्रपट प्रशिक्षण संस्था असलेल्या ‘भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था’ (FTII) पुणे येथे दोन दिवसीय शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. ५ आणि ६ मार्च २०२६ रोजी झालेल्या या भेटीत एकूण ९६ विद्यार्थी आणि ६ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.

या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मिती, टेलिव्हिजन तंत्रज्ञान, डिजिटल मीडिया आणि ध्वनी-चित्र संवाद क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता. दोन दिवसांच्या या दौऱ्यात प्रत्येक दिवशी ४८ विद्यार्थी आणि ३ प्राध्यापक सहभागी झाले होते.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी एफटीआयआय मधील फिल्म शूटिंग स्टुडिओ, एडिटिंग लॅब, साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि कॅमेरा उपकरण कक्षांना भेट दिली. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना आधुनिक कॅमेऱ्यांचे कार्य, प्रकाशयोजना, डिजिटल एडिटिंग आणि पोस्ट-प्रॉडक्शन् मधील व्हिज्युअल इफेक्ट्स यांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच, विद्यार्थ्यांनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांमार्फत बनवलेल्या लघुपटांचे स्क्रीनिंगही पाहिले, ज्यातून त्यांना कथा सांगण्याची कला आणि तांत्रिक कौशल्ये समजून घेता आली.

हेही वाचा – ‘सोशल मीडियावरील बदनामीला आळा घालण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या शैक्षणिक दौऱ्यात केवळ चित्रपट निर्मितीच नव्हे, तर त्यामागील गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानावरही भर देण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने खालील. ब्रॉडकास्टिंग सिस्टीम: अकौस्टिक्स आणि इमेजिंग:.,डेटा इन्फ्रास्ट्रक्चर:, युआय/युएक्स या विषयांचा समावेश होता:
विद्यार्थ्यांनी संस्थेतील प्राध्यापक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांशी संवाद साधून या क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि चित्रपट उद्योगातील बदलत्या तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली.

या उपक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. रणवीर घाटे(समन्वयक), डॉ. सुनील महाजन (असोसिएट डीन, स्टुडंट अफेअर्स) आणि कॉलेजचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. , डॉ. भालचंद्र पवार, प्रा. वैभव गलबले, प्रा. जयवंत भूमकर आणि प्रा. अमोल काळे या प्राध्यापकांनी या भेटीत विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button