पुणे हादरलं! कोंढव्यात डिलिव्हरी बॉय बनून तरुणीवर बलात्कार

पुणे | पुणे शहरातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी (२ जुलै) रात्री साडेसातच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर एका अज्ञात व्यक्तीने कुरिअर डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून घरात प्रवेश करत बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या नराधमाने अत्याचारानंतर पीडित तरुणीच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढला आणि “मी परत येईन” असा धमकीवजा संदेश टाइप करून ठेवला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बुधवारी रात्री साडे सातच्या सुमारास डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला.त्या सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये आरोपी गेला आणि तुमचे कुरिअर आल्याचे पीडित तरुणीला म्हणाला,हे कुरिअर माझे नसल्याचे तिने सांगितले.तरीही तुम्हाला सही करावी लागेल असे आरोपीने सांगितले.
हेही वाचा : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी
त्यामुळे पीडित तरुणीने सेफ्टी डोअर उघडले.त्याचवेळी आरोपीने पीडित तरुणीच्या तोडांवर स्प्रे मारला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर आरोपीने तिच्याच मोबाईलने सेल्फी काढत ‘परत येईल’, असे टाईप करून ठेवले, अशी घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे पुणे शहरात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी तपासाला गती दिली असून, लवकरच आरोपीला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले आहे.




