TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
कुटुंबीयांसह विसर्जनासाठी गेलेला सतरा वर्षीय युवक बेपत्ता
![A seventeen-year-old youth who went for immersion with his family has gone missing](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/download-14.jpg)
सोमवार पेठ परिसरात कुटुंबीयांसह विसर्जनासाठी गेलेला सतरा वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पियुष चंद्रकांत थोरात (वय १७) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याची आई मनीषा चंद्रकांत थोरात (वय ४५, रा. मंगलमूर्ती रस्ता, रास्ता पेठ) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. विसर्जनाच्या दिवशी पियुष कुटुंबीयांसह सोमवार पेठेतील शाहू उद्यान परिसरात गेला होता.
त्यानंतर तो तेथे नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्याची तब्येत बरी नसल्याने तो घरी गेला असावा, असे त्याच्या कुटुंबीयांना वाटले. त्यानंतर कुटुंबीय घरी गेले. तेव्हा पियुष घरी नसल्याचे लक्षात आले. त्याचा शोध घेण्यात आला. मित्रांकडे चौकशी करण्यात आली. त्याचा ठावठिकाणा न लागल्याने त्याच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके तपास करत आहेत.