TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोठा अनर्थ टळला

पुणे | अमृतांजण पुलापुढे गेल्यावर हा ट्रक थांबला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर विनाचालक ट्रकचा थरारक प्रवासाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. -मुंबई द्रुतगती मार्गावर मोठा अनर्थ टळला. विनाचालक एक ट्रक सुसाट वेगाने डिवायडरवर धडकत धावत होता. सुदैवानं ट्रकने कोणत्याही गाड्यांना धडक दिलेली नाही. मोठी दुर्घटना टळली. हा ट्रक पुण्याहून सिमेंटच्या गोणी घेऊन मुंबईकडे निघाला होता. अमृतांजण पुलाआधी ट्रकचा ब्रेकफेल झाला होता. घाबरून ट्रक चालकाने उडी मारली, पण ट्रक मात्र सुसाट वेगाने धावतच होता. ट्रक डिवायडरला धडक देत पुढे जात होता. अमृतांजण पुलापुढे गेल्यावर हा ट्रक थांबला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर विनाचालक ट्रकचा थरारक प्रवासाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

ब्रेकफेल झालेल्या ट्रकचा चालकाविना प्रवास

एक ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. हा ट्रक सिमेंटच्या गोळ्या मुंबईकडे घेऊन जात होता. यावेळी अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाला. ही बाब ट्रकचालकाच्या लक्षात आली. यावेळी ट्रकचालकाने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी घाबरून ट्रकमधून खाली उडी मारली. यावेळी ट्रकचा ब्रेकफेल झालेला असल्यामुळे ट्रक तसाच विनाचालक रस्त्यावरून धावत होता. ट्रक अमृतांजण पुलाजवळ असताना ट्रकचा ब्रेकफेल झाला. ड्रायव्हरने ट्रकमधून उडी मारल्यानंतर ट्रक विनाचालक पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सुसाट धावत होता. ट्रक डिवायडरवर धडक देत भरधाव वेगाने धावत होता. ट्रकचा हॅन्डब्रेक निकामी झाल्याने ट्रक बिना चालकाचा सुसाट पळाला. अमृतांजन पुलापासून सुमारे 500 मीटर अंतरावर ट्रकने खडकाला धडक दिल्याने ट्रक थांबला आणि मोठा अपघात टळला.

विनाचालक एक ट्रक सुसाट वेगाने डिव्हाईडर धडकत धावत होता. सुदैवाने त्याची ठोकर इतर वाहनांना लागली नाही. अन्यथा पुण्यातील नवले पुलावर जसं असंख्य वाहनांना एका अवजड वाहनाने धडक दिली. अगदी तसंच काहीसं इथंही घडलं असतं. पुण्याहून सिमेंटच्या गोणी घेऊन हा ट्रक मुंबईला निघाला होता. तेव्हाच अमृतांजण पुलाच्या आधी ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि या ट्रकची आधी बसला धडक बसली. त्यामुळे घाबरलेल्या चालकाने ट्रकखाली उडी घेतली. ट्रक मात्र तसाच सुसाट वेगाने पुढं गेला अन डिव्हाईडरला धडकत धावत राहिला. अमृतांजन पुलापुढे गेल्यावर ट्रक थांबला अन सर्वांचा जीव भांड्यात पडला. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button