Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुरंदर जयाद्रीच्या कऱ्हेकाठी कालासिद्धीचा शास्त्रीय नृत्यमय सोहळा

सासवडच्या कलासिद्धी नृत्यअभिनव विद्यालयाचा अरंगेत्रम सोहळा उत्साहात

पुरंदर | विजयकुमार हरिश्चंद्रे

पुरंदर जयाद्री खोऱ्यातील ऐतिहासिक, धार्मिक, साहित्यिक व सांस्कृतिक नगरी असलेल्या सासवड येथील कलासिद्धी नृत्यअभिनव विद्यालयाचा अरंगेत्रम नृत्यसोहळा कऱ्हेकाठी आचार्य अत्रे रंगकला सांस्कृतिक भवनात उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात नृत्य मार्गदर्शिका धनश्री लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. श्रीशा लोमटे, हिमानी जेधे, युगंधरा खालकर व इरा बोरावके यांनी सादर केलेले शास्त्रीय नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तुती नटेश कौतुकम्ने झाली. त्यानंतर आलारिपू, शब्दम् यांसारख्या पारंपरिक शास्त्रीय रचनांचे सादरीकरण करण्यात आले.

हेही वाचा         :          प्रचारासाठी मिळणार केवळ ११ दिवस!

रामायणावर आधारित राघव वर्णनम् या रचनेला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच संत रचना, कीर्तन अभंग, संत मीराबाईंची भजने व दोहे यांचे नृत्यशैलीतील सादरीकरण रसिकांच्या मनाला भावून गेले. नटवर्णम् व गायनाच्या माध्यमातून गायिका मोनिका किंबहुने व धनश्री लोमटे रसिका यांनी काही पदरचना सादर केल्याने कार्यक्रम अधिक सुरेल झाला.

संगीत संयोजनात मृदंगावर दक्षिणामूर्ती पिल्लई, व्हायोलिनवर अजय चंद्रमोळी, बासरीवर संजय शशिधरण तर घटमवर पंडी सेलवी पिल्लई यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमास उद्योजक लक्ष्मण सोडनवर, रेश्मा सोडनवर, संजय काटकर, संदीप टिळेकर व अभिजित जगताप उपस्थित होते. नृत्य संयोजन रितुषा झगडे, मनशा जगताप, सलोनी झेंडे व शर्वरी देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन किशोरी पवार व स्वानंद लोमटे यांनी केले, तर आभार वैभवी परराडकर यांनी मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button