TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात रविवारी अवघ्या तीन तासात 62.46 मिमी पाऊस,पुढील दोन दिवस ही धोक्याचे

पुणे | पुणेकरांना 1961 साली आलेल्या पानशेतपुराची आठवण नक्की आली असणार कारण पुण्यात रविवारी (दि.11) सायंकाळी पाच ते आठ या केवळ तीन तासात सरासरी 62.46 मि.मि. पावसाची नोंद झाल्याची माहिती पुणे महापालिकेने दिली आहे. त्या तीन तासात सर्वाधिक पावसाची नोंद हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात तब्बल 85.09 मि.मि. इतकी झाली. सर्वात कमीचा विचार करायचा झाला तर सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात कमी म्हणजे 22.61 मि.मि. इतकी नोंद झाली आहे.

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातल्या सुमारे 59 ठिकाणी पाणी साठल्याची नोंद महापालिकेकडे झाली आहे. यामध्ये घरे, इमारत, सोसायटी या परिसरात पाणी शिरण्याच्या 38 घटनांची नोंद झाली आहे.तसेच शहरात झाड पडण्याच्या 11 घटना व भिंत पडण्याच्या 10 घटनांची माहिती प्राप्त झाली आहे. यावेळी महापालिका व अग्निशमन दलाच्या पथकाने युटीलिटी व्हॅन, जेटींग मशीन, ट्रक व जे. सी. बी. या साधनांनी आपत्ती व्यवस्थापनाचे काम केले.

पुढील दोन दिवस परिसरात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.त्यामुळे शहरात कोठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी पुणे महापालिकेशी 020 – 25506800, 25506801, 25506802, 25506803, 25506804 या क्रमांकावर संपर्क साधावा हे क्रमांक 24 तास उपलब्ध असणार आहेत. तसेच अग्निशमन दलाला 101 किंवा 020 – 26451707 या क्रमांकावर मदत मागावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button