हॉटेलमध्ये सुरुय वेश्या व्यवसाय, पोलिसांनी तीन तरुणींची केली सुटका
![Sex racket under the name of spa center in Wakad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/images_1565706256232__sex_racket_.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुणे-सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे तर 3 महिलांची सुटका केली आहे.
पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पांढरेवाडी गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर असलेले अनुराधा हॉटेल याठिकाणी देहविक्री व्यवसाय केला जात आहे, अशी गोपनीय माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल गवळी यांना मिळाली होती. गवळी यांनी या बद्दलची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना दिली. त्यानंतर त्या हॉटेलवर छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले.
पोलिसांनी अनुराधा हॉटेलमध्ये बोगस गिऱ्हाईक प्रथम पाठवला. त्यानंतर सेक्ट रॅकेटची खबर पक्की झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या टीमने छापा टाकला. हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी ठेवलेल्या तीन महिलांची सुटका पोलिसांनी केली. त्यापैकी दोन महिला या पश्चिम बंगालमधील आहे तर एक महिला महाराष्ट्रीयन आहे.
हॉटेल चालक दिवाकर मथु शेट्टी (वय 34, राहणार उडपी राज्य कर्नाटक) व डायसन डेनिस डिसूजा (वय 27) या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करत आहेत.