हिंजवडीत कोणतीही आयटी कंपनी स्थलांतराच्या तयारीत नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/hinjewadi-it_20180258080.jpg)
पुणे – वारंवार होणारी वाहतूक कोंडी, पराभूत सुविधांचा अभाव म्हणून हिंजवडी आय टी पार्कमधून एक-दोन नव्हे तर तब्बल ५६ कंपन्या स्थलांतरित होत असल्याच्या बातमीचा स्पष्ट इन्कार हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन संस्थेने केला आहे. सध्या असलेल्या आय टी कंपन्यांपैकी कोणतीही स्थलांतर करत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष अनिल पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे वृत्त नाकारले आहे. ते म्हणाले की, आमच्याकडे सुमारे ८८ हुन अधिक कंपन्या सभासद आहेत. अनेक कंपन्यांचे येथे प्रोजेक्ट सूरु आहेत. आमच्या तरी ऐकिवात असे काहीही नाही आणि तसे काही झालेही नाही. मात्र आयटी कंपन्या व्यतीरिक्त एखादी फर्मास्युटिकल आणि इंजिनेअरिंग कंपनी स्थलांतरीत होत असेल तर सांगता येत नाही, परंतू, आमच्या आयटी कंपन्यापैकी तरी कोणी स्थलांतरित होण्याच्या मानसिकतेत नाही.