Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
हडपसरमध्ये पुठ्ठा कंपनीला लागली आग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/9-10.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुण्यात पुठ्ठा कंपनीला आज (शनिवारी) सकाळी आग लागली. हडपसरमध्ये सातव नगर परिसरात विवेकानंद इंडस्ट्रीअल भागात ही आग लागली होती. पण अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी पुठ्ठा कंपनीला आग लागलेली आग नियंत्रणात आणली.
दरम्यान, पुठ्ठा कंपनीला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. या लागलेल्या आगीत वित्तीय हानी झाली असून जिवितहानी टळली आहे.