breaking-newsताज्या घडामोडीपुणे

स्टिअरिंग सोडलं; अन्ं मुख्यमंत्र्यांनी चालत्या गाडीतून केला नमस्कार

पुणे – राज्यात तीन चाकी सरकार आहे. पण या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हाती असल्याचं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्याची चर्चा रंगलेली असतानाच प्रत्यक्ष गाडीच्या स्टिअरिंगवरील आपलं कौशल्य दाखवलं दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल पुण्यात चालत्या गाडीतूनच अधिकारी-पत्रकारांना नमस्कार केला. यावेळी त्यांनी स्टिअरिंगवरील दोन्ही हात सोडून चालत्या गाडीतून सर्वांना हात जोडून नमस्कार केला. त्यामुळे केवळ सरकारच्याच नव्हे तर गाडीवरील स्टिअरिंगवरही मुख्यमंत्र्यांची हुकूमत असल्याचं दिसून आलं.

पुण्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल पुण्यात आले होते. दिवसभर अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्वव ठाकरे सायंकाळी पुण्याहून मुंबईकडे जायला निघाले. शासकीय कार्यालयातून मुख्यमंत्र्यांची गाडी बाहेर पडताच बाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांनी प्रश्न विचारण्यासाठी धाव घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गाडी सुरू असतानाच स्टिअरिंगवरील दोन्ही हात काढले आणि हात उंचावून पत्रकार आणि अधिकाऱ्यांना नमस्कार केला. नकळतपणे झालेल्या या प्रकारामुळे मात्र पुन्हा एकदा स्टिअरिंग कुणाच्या हाती? या विषयावरून चर्चा रंगली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button