सोमनाथ महाराजांची तृप्ती देसाईला धमकी; अकोलेत ये, तुला कापूनच टाकतो
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/2020_2large_21_trupti-deai-and-indurikar-maharaj.jpg)
पुणे |महाईन्यूज|
‘किर्तनातून महिलाचा वारंवार अपमान करणारे निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर यांच्यावर मी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अनेक धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केले आहे.
धनकवडी येथे राहत्या घरी ( दि.21) सकाळी अकोले तालुक्यातील भोर येथून सोमनाथ महाराज यांनी फोन करुन अश्लील शिवीगाळ केल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी कॉल रेकॉर्डिंग सुरू केले. ”तू जर इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाही तर, तू अकोलेत ये, तुला कापूनच टाकतो”अशा भाषेत धमकी दिली.
याप्रकारामुळे ”माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीविताला पुन्हा एकदा इंदुरीकर आणि त्यांच्या समर्थकांकडून धोका निर्माण झालेला आहे असे त्यांनी सांगितल. यासंदर्भात पुण्यातील सहकारनगर पोलिस स्टेशन येथे मेलद्वारे त्यांनी काल तक्रार दाखल केली आहे.