breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सेट परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ, आता 29 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार

अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

पुणे |महाईन्यूज|

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी आयोजित करण्यात आलेली 36 वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 28 जून 2020 रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत आणखी आठवड्याने वाढवून ती 29 जानेवारी 2020 अशी करण्यात आली आहे, असे विद्यापीठ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या 36 व्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची मुदत आधी 22 जानेवारी 2020 पर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. अर्ज भरताना त्यात काही त्रुटी राहिल्यास दुरुस्ती करण्यासाठीची मुदतही आठवड्याने वाढवण्यात आली आहे. ही मुदत आता 6 फेब्रुवारी 2020 अशी असेल, असे निवेदन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button