सासवडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाला १ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
सासवड – सासवड येथील कोर्टात संदिप बाळकृष्ण होले यांच्यावर गुन्ह्यातील दाखल प्रकरणात आरोपीला जामीन मिळविण्यासाठी मदत करण्याच्या कामी एक लाखांची लाच स्विकारताना एका सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि राजकीय पक्षाच्या पदाधिका-याला रंगेहाथ पकडले.
यामध्ये सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद काशिनाथ पालवे (४२) व एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी श्रीकांत बाळासो ताम्हाणे (वय २९) यांचा समावेश आहे. सासवडजवळील एखतपूर येथे गुरुवारी दि. २८ जून) रात्री ११ च्या सुमारास लाचलुचपत विभागाचे वतीने कारवाई केली. संदिप बाळकृष्ण होले यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूरीसाठी सहकार्य करणेसाठी लोकसेवक पालवे यांनी दीड लाखांची मागणी केली. त्यातील एक लाख रुपये श्रीकांत ताम्हाणे याने घेत व त्यांनी पदाचा गैरवापर केला व गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले. म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे फिर्यादी प्रतिभा प्रल्हाद शेंडगे पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत पुणे यांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत.